समाजाच्या विकासासाठी एक सकारात्मक पाऊल

सावित्रीबाई फुले महिला मंडळ ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असून महिला आणि समाजातील गरजू घटकांच्या विकासासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.

संस्थेची स्थापना 02 जानेवारी 2008 रोजी झाली असून सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे या मूल्यांवर संस्थेचा कार्यप्रवास आधारित आहे.

आमचे ध्येय केवळ मदत करण्यापुरते मर्यादित नसून, गरजू व्यक्तींना स्वावलंबी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे हे आहे.